बाप-लेकाने 200 जणांकडून काढले 700 कोटी, पुण्यात आले अन्......
पुणे :- सध्याच्या काळात सहजासहजी कोणी एक रुपयाही देत नाही. दुसरीकडे कमी वेळेत जास्त पैसे कमवायचं आमिष दाखवून हजारो नाही तर करोडो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचेही प्रकार घडतात. असाच एक प्रकार नुकताच दिल्लीत घडलाय.
तिथे एका पिता-पुत्राने कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून सुमारे 200 जणांची तब्बल 7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडलीय. सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने एक व्यापारी आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. हे दोघेही चिटफंडच्या माध्यमातून अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करत होते. रविंदर कुमार पांडे आणि त्याचा मुलगा प्रसून पांडे (वय 33) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रसूननं बीबीएची पदवी घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
पुण्यातून करण्यात आली अटक
या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. ते पुण्यामध्ये भाड्याचं घर घेऊन राहत होते. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितलं की, 'आरोपी रविंदर गोयला डेअरी परिसरात स्वतःच्या कुटुंबासह राहत होता. आरोपीने फायनान्सचा व्यवसाय सुरू केला होता. कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी त्याने लोकांची आर्थिक फसवणूक करण्यास सुरुवात केली.'
अशी करत होते फसवणूक
आरोपी लोकांची कशा पद्धतीने फसवणूक करत होते, याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. प्लॉट खरेदी करण्यामध्ये रुची असणाऱ्या आणि जास्त संपत्ती असणाऱ्या लोकांशी ते सुरुवातीला ओळख करून घ्यायचे. त्यानंतर त्यांना काही दिवसांत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये घेत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला पैसे दुप्पट करण्याच्या आमिषानं पैसे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना काही रक्कमदेखील आरोपी देत होते. त्यानंतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम झाल्यानंतर ते दिल्ली सोडून इतर शहरात पळून जात होते. पळून जात असताना कोणी माग काढू नये, म्हणून ते त्यांचा मोबाइल आणि सिमही नष्ट करायचे. बाप-मुलाची जोडी काही काळ नोएडामध्ये लपून बसली होतीस परंतु तिथे त्यांना फसवणूक झालेल्या पीडितांनी गाठलं, त्यानंतर आरोपींनी पुणे शहर गाठलं आणि तिथे ते भाड्याचं घर घेऊन राहत होते. आरोपींनी लखनौजवळ जमिनीतही पैसे गुंतवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.