Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' उमेदवारांना कोकण रेल्वेमध्ये आहे 18 ते 44 हजार रुपये पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! पटकन माहिती वाचा आणि ताबडतोब अर्ज करा

'या' उमेदवारांना कोकण रेल्वेमध्ये आहे 18 ते 44 हजार रुपये पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! पटकन माहिती वाचा आणि ताबडतोब अर्ज करा
 

सध्या रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी सुवर्णसंधीचा काळ असून भारतीय रेल्वे खात्यामार्फत आता विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. रेल्वेचे नाही तर बँकिंग तसेच इतर महत्त्वाच्या शासकीय विभागांमध्ये देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व त्यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आलेली आहे.

याकरिता आता उमेदवारांनी वेळ वाया न घालवता वेगवेगळ्या ठिकाणी पटकन अर्ज करणे गरजेचे आहे. अगदी याचप्रमाणे तुम्ही देखील रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून भारतीय रेल्वे विभागाच्या महत्त्वाच्या असलेल्या कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येत आहेत. याच भरती विषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

कोकण रेल्वेमध्ये होणार भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या भरती करिता अर्ज मागविण्यात आलेले असून कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 190 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांनी सहा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या भरतीत फक्त महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील उमेदवार पात्र ठरणार आहेत.

विविध विभागांतर्गतपदाचे नाव आणि रिक्तजागांची संख्या विद्युत विभाग
1- वरिष्ठ विभागअभियंता– एकूण रिक्त जागा पाच आहेत.

2- तंत्रज्ञ( टेक्निशियन-I II)- या पदाच्या रिक्त जागा 15 आहेत.

3- असिस्टंट लोकोपायलट– या पदासाठीच्या रिक्त जागांची संख्या 15 आहे.
नागरीविभाग

1- वरिष्ठविभाग अभियंता– या पदाच्या एकूण रिक्त जागा पाच आहेत.

2- ट्रॅकमेंटेनर– या पदाच्या एकूण रिक्त जागा 35 आहेत.

यांत्रिक विभाग

1- तंत्रज्ञ( टेक्निशियन I II)- या पदाच्या एकूण रिक्त जागा वीस आहेत.

ऑपरेटिंग विभाग
1- स्टेशनमास्टर– या पदाच्या एकूण रिक्त जागा 10 आहेत.

2- गुड्सट्रेनमॅनेजर– या पदाच्या एकूण रिक्त जागा पाच आहेत.

3- पॉईंट्समॅन– या पदाच्या एकूण रिक्त जागा 60 आहेत.
सिग्नल आणि दूरसंचार विभाग

1-ESTM-III- या पदाच्या एकूण रिक्त जागा 15 आहेत.

व्यावसायिक विभाग

1- व्यावसायिक पर्यवेक्षक– या पदाच्या एकूण रिक्त जागा पाच आहेत.


याउमेदवारांनाच करता येईल अर्ज

1- जमीन संपादित करण्यातआलेलेउमेदवार– यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात केआरसीएल प्रकल्पाकरिता ज्या उमेदवारांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

यामध्ये जमीन गेलेल्यांचे जोडीदार म्हणजेच (पत्नी किंवा पती), मुलगा, मुलगी, नातू आणि नातवंडे देखील पात्र ठरणार आहेत व निवड प्रक्रियेमध्ये अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य मिळणार आहे.

2- वैध एम्प्लॉयमेंटएक्सचेंजकार्ड असलेलेउमेदवार– तसेच कोकण रेल्वे मार्गावरील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत वैध एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड असलेल्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य या भरतीत मिळणार आहे.

3-गोवा, महाराष्ट्रआणिकर्नाटकमध्ये राहणारेउमेदवार– तिसरे प्राधान्य हे महाराष्ट्र तसेच गोवा किंवा कर्नाटकमध्ये राहणाऱ्या उमेदवारांना दिले जाणार आहे.

4- केआरसीएल कर्मचारी संस्थेचे कर्मचारी– तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात केआरसीएल कर्मचारी संस्थेचे तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात केआरसीएल कर्मचारी संस्थेचे कर्मचारी ज्यांनी या संस्थेत किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केली आहे ते देखील या भरतीकरिता पात्र ठरणार आहेत.
काय आहे वयोमर्यादा?

वरील पात्रता जे उमेदवार पूर्ण करतील ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत व यासाठी उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे व अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोना कालावधीमुळे ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी उच्च वयोमर्यादा ही 33 वरून 36 करण्यात आलेली आहे. राखीव प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज करतील त्यांना देखील वयामध्ये सवलत दिली जाणार आहे.

किती मिळेल पगार?
1- सीनियरसेक्शनइंजिनिअर– प्रति महिना 44 हजार 900 रुपये

2- स्टेशनमास्टर– 35 हजार चारशे रुपये

3- व्यावसायिक पर्यवेक्षक– पस्तीस हजार चारशे रुपये

4- गुड्सट्रेन मॅनेजर– 29 हजार दोनशे रुपये

5- टेक्निशियन( इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल)- एकोणवीस हजार नऊशे रुपये

6- असिस्टंट लोकोपायलट– नऊ हजार 900 रुपये

7- पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमेंटेनर– अठरा हजार रुपये प्रति महिना

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.