16 सप्टेंबरच्या ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल; 17 तारखेला अनंत चतुर्थी असल्याने निर्णय
सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद मिलाद हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात.
यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी हिंदूंचा सण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.