Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक ! 'त्या' दोघींवर 11 जणांकडून अत्याचार

संतापजनक ! 'त्या' दोघींवर 11 जणांकडून अत्याचार
 

रामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरात दारू पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय 27, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय 20, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय 21, रा. सावळ, ता. बारामती), जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चौघांना अटक केली होती. त्यात आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणीक भंडारी (पूर्ण नाव,पत्ते नाहीत) यांची भर पडली आहे. या मुली बारामतीतून 14 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या होत्या. तपास सुरू असताना एका मुलीनेच एसटीतून दुसर्‍या एका व्यक्तीचा फोन घेत आईला फोन करत माहिती दिली. आईने पोलिसांना कळविल्यानंतर पुणे पोलिसांच्या सहकार्याने बारामतीच्या पोलिस पथकाने दि. 16 रोजी या दोन मुलींना बारामतीत आणले. सुरुवातीला या गुन्ह्यात ज्ञानेश्वर याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली.

बारामतीतून या मुली एसटीने हडपसरला गेल्यानंतर ज्ञानेश्वर हा पाठीमागून गेला होता. तेथे एका मित्राच्या खोलीवर दारू पाजत या अल्पवयीन मुलींचे चौघांनी लैंगिक शोषण केले होते. सुरुवातीला या घटनेत चारच आरोपी निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तपास सुरू ठेवत मुलींना विश्वासात घेत यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का याची चौकशी केली. त्या वेळी यापूर्वी आणखी सात जणांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 11 वर गेली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.