'पिंजऱ्यातला बंद पोपट', 11 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआयला करुन दिली आठवण
दिल्लीतील दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलाय. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना न्यायाधीश भुइया यांनी सीबीआय संबंधी महत्त्वाची टिप्पणी केली. सीबीआयला पिंजऱ्यातील बंद पोपटाची जी प्रतिमा आहे, त्यातून मुक्त झालं पाहिजे असं न्यायाधीश भुइया म्हणाले. सीबीआयला हे दाखवून द्यावं लागेल, की ते पिंजऱ्यातील बंद पोपट नाहीयत. ते मुक्त आहेत.
‘निष्पक्ष तपास झाला नाही, ही धारणा बदलली पाहिजे’ असं जस्टिस भुइयां म्हणाले. जामिनाबद्दल जस्टिस भुइंया यांनी सहमती व्यक्त केली. पण CBI च्या अटकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांनी अटकेच्या वेळेवर प्रश्न विचारला. सीबीआय प्राथमिक तपास संस्था आहे. तपास व्यवस्थित झाला नाही, असा संदेश नाही गेला पाहिजे. पिंजऱ्यातील बंद पोपटाची सीबीआयची प्रतिमा बदलली पाहिजे असं जस्टिस भुइंया म्हणाले.
भाजपाने काय म्हटलय?
सीबीआयवर पिंजऱ्यातील बंद पोपटाची जस्टिस भुइयां यांनी जी कॉमेंट केली, त्यावर भाजपाची प्रतिक्रिया आली आहे. “हा डिवीजन बेंचचा निर्णय आहे. माननीय न्यायाधाशींच्या कॉमेंटचा आम्ही आदर करतो. सीबीआय आता पिंजऱ्यातील बंद पोपट राहिलेला नाही, तर तो ससाणा बनलाय” असं गौरव भाटिया म्हणाले.
किती लाखाच्या बॉन्डवर केजरीवाल यांना जामीन
सुप्रीम कोर्टाकडून केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीमध्ये प्रचंड उत्साह आहे. 156 दिवसानंतर केजरीवाल तिहार तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर 1 तासाने केजरीवाल यांच्या वकिलांना मिळेल. त्यानंतर केजरीवाल यांचे वकील ही ऑर्डर घेऊन लोअर कोर्टात जातील. लोअर कोर्ट जामिनाच्या अटी निश्चित करेल. त्यानंतर सुटकेचा आदेश तिहार तुरुंगात येईल. या सगळ्या प्रक्रियेत दोन-अडीच तासाचा वेळ लागेल. केजरीवाल यांना 10 लाखाच्या बॉन्डवर जामीन मिळाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.