Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Vinesh Phogat ला सिव्हर मेडल? IOC अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिला निर्णय, 'मला त्या कुस्तीपटूबद्दल...'

Vinesh Phogat ला सिव्हर मेडल? IOC अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिला निर्णय, 'मला त्या कुस्तीपटूबद्दल...'

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा अपात्र प्रकरणात CAS (Court of Arbitration for Sports) आज निर्णय देणार आहे. विनेश फोगाट हिला सिल्वर मेडल बहाल करायचं की नाही याबद्दल ते सांगणार आहेत.

अशातच आंतरराष्ट्रीय ओलंपिक समिती म्हणजे (IOC President) अध्यक्ष थॉमस बाख यांनी आपलं मत मांडलंय. विनेश फोगाटबद्दल 'सहानभुती' असल्याच ते म्हणाले आहेत. पण ते असंही म्हणाले की, 'काही परिस्थितींमध्ये लहान सवलती दिल्यानंतर एखादी रेषा कुठे आखली जाणार.'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये 29 वर्षीय विनेश 100 ग्रॅम जास्त वजनामुळे बुधवारी झालेल्या महिला कुस्तीच्या 50 किलो गटातील सुवर्णपदक लढतीतून अपात्र ठरली. त्यानंतर तिने CAS मध्ये आपल्या अपात्रतेविरुद्ध अपील केलंय आणि निवृत्त होण्यापूर्वी तिला रौप्य पदक मिळावं अशी मागणी करण्यात आलीय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.