आम्ही पोलिस-पोलिस भाऊ-भाऊ, मिळून सगळे वाटून खाऊ! लाचेचे पैसे वाटून घेतानाचा तिघांचा Video Viral
दिल्ली पोलिसांचा एक लाजिरवाणा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक पोलिस कर्मचारी एका झोपडीमध्ये वाहन चालकांना पकडून घेवून येत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.
इतकेच नाही तर या व्हिडीओमध्ये हे तीन पोलिस त्यांची त्या दिवसाची काळी कमाई आपापसात वाटून घेताना दिसत आहेत. हे प्रकरण आहे दिल्लीतील गाजीपूर येथील एका पोलिस चौकीचे. शनिवारी ट्राफिक विभागात तैनात असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ असून एक पोलिस कर्मचारी लाच घेताना कॅमेऱ्यात सापडला, इतकेच नाही तर नंतर त्याने हे पैसे इतर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत वाटून घेतले. ही वाटणी करतानाचा देखील व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी पोसिल चौकीत एका व्यक्तीसोबत वाद घालताना दिसत आहे. थोड्या वेळानंतर पोलिस कर्मचारी त्या व्यक्तीला इशारा करतो आणि तो व्यक्ती पोलसाच्या मागे खुर्चीवर पैसे ठेवून निघून जातो. तो व्यक्ती पैसे ठेवून निघून गेल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने ते पैसे घेऊन आपल्या खिशात ठेवले.
त्यानंतर थोड्या वेळाने तो ते पैसे मोजू लागतो. यानंतर व्हिडीओमध्ये तीन पोलिस कर्मचारी त्याच जागेवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत आणि पैशांची वाटणी करत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सांगितले की, तीन पोलिस कर्मचारी दोन सहायक उपनिरिक्षक आणि एक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबीत करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.