SOLR PANEL : फक्त 1200 ते 1500 रुपये खर्च करा आणि विजबिलापासून मिळेल मुक्तता, कसा? ते वाचा
सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून देखील वेगवेगळे पावले उचलले जात आहेत व त्यामुळे अनेक योजनांची देखील अंमलबजावणी केली जात आहे.
वाढत्या वीज बिलांमुळे त्रासलेल्या लोकांकरिता सौर ऊर्जेचा वापर हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आलेला आहे. व याकरिताच घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्या माध्यमातून घराला आवश्यक असलेल्या विजेचा वापर आपल्याला करता येतो व विजबिल पासून कायमची मुक्तता मिळवता येते. तसेच पर्यावरण स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील सौर ऊर्जेचा वापर हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आलेला आहे. परंतु सोलर पॅनलच्या किमती पाहिल्या तर त्या जास्त असल्यामुळे बऱ्याच जणांना सोलर पॅनल बसवणे शक्य नाही. त्यामुळे पीएम सूर्यघर योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून यावर अनुदान देखील दिले जात आहे.
याव्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या घरी सोलर पॅनल बसवायचे असेल तर तुम्ही सोलर कॉम्बो पॅकेजेच्या माध्यमातून अवघ्या बाराशे तीस रुपयांच्या मासिक पेमेंटमध्ये देखील सोलर सिस्टम बसवू शकतात. नेमके हे कॉम्बो पॅकेज कसे आहेत व त्यांचे स्वरूप? त्यांची माहिती आपण बघणार आहोत.
1230 मध्ये छतावर बसवा उत्तम सोलरपॅनल
दिवसेंदिवस आता सौर ऊर्जेचा वापर व सोलर पॅनल यांची लोकप्रियता वाढतांना दिसून येत आहे व बाजारामध्ये देखील अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे ब्रँड्सची सोलर उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये कमीत कमी किमती पासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंतचे उपकरणे आपल्याला पाहायला मिळतात.
या परिस्थितीमध्ये काही ब्रँड्सकडून सोलर कॉम्बो पॅक विकले जात आहेत. सोलर कॉम्बो पॅक खरेदी करून तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये संपूर्ण सोलर सिस्टम मिळते. या माध्यमातून तुम्ही पैशांची बचत देखील करू शकतात व सोलर सिस्टम देखील बसू शकतात.
जिनस सोलर कॉम्बो पॅकेज
जीनस सोलर सोल्युशन ही भारतातील एक लोकप्रिय कंपनी असून जे सोलर कॉम्बो पॅकेज ऑफर करते. या पॅकेजेच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरी सोलर सिस्टम सहजपणे इन्स्टॉल करू शकतात. या पॅकेज अंतर्गत सौर यंत्रणेमध्ये तुम्ही 165 वॅट सौरपॅनल व सुरजा एल सोलर यूपीएस( इन्वर्टर ) आणि 150Ah लांब टीब्युलर बॅटरी मिळते. तसेच याच्यामध्ये किंमत 25 हजार रुपये असून तुम्हाला कर्ज सुविधा मिळवून यासाठी मासिक ईएमआय 1231 रुपये भरावा लागेल. या पॅकेज अंतर्गत मिळणाऱ्या इन्व्हर्टरवर दोन वर्षांची वारंटी आहे.
लुमिनस सौर कॉम्बो पॅकेज
लुमिनस ही भारतातील एक आघाडीचे सौर आणि विद्युत उपकरणे बनवणारी कंपनी आहे. लुमिनस कंपनीच्या माध्यमातून देखील सोलर कॉम्बो पॅकेज देण्यात येत असून पॅकेजमध्ये दोन 165 वॅटचे सोलर पॅनल तसेच NXG चौदाशे सोलर इन्वर्टर आणि LPTT 1215H सोलर बॅटरी मिळते.तसेच या पॅकेजची किंमत 35 हजार रुपये असून यावर तुम्हाला कर्ज सुविधा मिळते व मासिक ईएमआय 1550 रुपये इतका भरावा लागतो.
सोलर कॉम्बो पॅकेज घेतल्यानंतर काय होतात फायदे?
1. या पॅकेज अंतर्गत जर तुम्ही सोलर पॅनल घेतले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जास्त सुरुवातीला गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही व तुम्ही कमी किमतीत यंत्रणा बसू शकतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे याला ईएमआय पर्याय असल्यामुळे तुम्ही सुलभ हप्त्यांमध्ये पैसे परतफेड करू शकतात. या कालावधीमध्ये तुम्ही सोलर पॅनल साठी लागणारे पैसे परत करू शकतात.2. घराच्या छतावर सोलर सिस्टम पासून तुम्ही तुमचे वीज बिल मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतात. तसेच सोलर सिस्टमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ते इन्स्टॉल केल्यानंतर ग्रीड वरील तुमच्या अवलंबित्व कमी होते.3. तसेच सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि हरित ऊर्जा असल्याकारणाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील ती फायद्याची आहे व सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही.4. बॅटरीसह येणाऱ्या या पॅकेजमुळे पावर कट झाले असतील तुम्हाला वीज मिळत राहते. त्यामध्ये तुम्ही पावर बॅकअप करीता इन्स्टॉल केलेली बॅटरीचा वापर तुमच्या गरजेनुसार करू शकतात.अशाप्रकारे सोलर कॉम्बो पॅकेज हे घराच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा एक परवडणारा आणि प्रभावी मार्ग आहे. जीनस आणि लुमिनस सारख्या कंपन्यांचे हे पॅकेज मासिक ईएमआय वर उपलब्ध आहेत व त्या माध्यमातून तुम्ही घरी सोलर सिस्टम इन्स्टॉल करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.