Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

SC, ST च्या कोट्यात क्रिमिलेयर नको :, रामदास आठवले

SC, ST च्या कोट्यात क्रिमिलेयर नको :, रामदास आठवले 
 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेयर निकष लागू करण्यात येऊ नये, तसा प्रयत्न केल्यास विरोध अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी मांडली.

अलिकडेच दुर्लक्षित जातींच्या उत्थानासाठी राखीव वर्गांना आरक्षण मंजूर करण्याकरिता उपवर्गीकरण जाती व जमातींमध्ये उपवर्गीकरण करून आरक्षण कोटा ठरविण्याचा अधिकार सर्व राज्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या ऐतिहासिक निकालाच्या पृष्ठभूमीवर रिपइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही केली.

रामदास आठवले : ओबीसी आणि सामान्य श्रेणी सदस्यांसाठी आरक्षणात समान उप-वर्गीकरण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. एससी, एसटींचे आरक्षण जातीवर आधारित आहे, तेव्हा एससी, एसटींच्या आरक्षणासाठी क्रिमिलेयरचे निकष करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचा आम्ही तीव्र विरोध करू, असा इशारा आठवले यांनी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने गुरुवारी ६-१ बहुमताने ठरवले की, एससी-एसटींमध्ये अधिक मागासलेल्या जाती व जमातींमध्ये उपवर्गीकरण करून आरक्षण कोटा ठरविण्याचा अधिकार सर्व राज्यांना अधिकार असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.