Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता पोलीसांच्या बाईक, कारवर ' 'POLICE' लिहाल तर खबरदार! वाहनांवर कारवाई होणार

आता पोलीसांच्या बाईक, कारवर ' 'POLICE' लिहाल तर खबरदार! वाहनांवर कारवाई होणार 
 
 
राज्यातील सर्वात पोलिसांसाठी एक महत्त्वाची बातमी  ने पोलीस किंवा बोध चिन्ह आपल्या वाहनावर लावलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार आहे.
 

पोलीस यंत्रणेत नोकरी मिळाली तर ही मोठी अभिमानाची गोष्ट असते. आपल्यातील काहीजण पोलीस यंत्रेत नोकरी असतीलच. पोलीस म्हटलं म्हणजे एक रुबाबदार व्यक्तीमत्व समोर येत असतं. पोलीस झाल्यानंतर अनेकांची देहबोली वेगळी होत असते. वागण्या बोलण्या एक वेगळा भाव निर्माण होत असतो. पोलीस झाल्यानंतर आपल्यातील अनेकजण आपल्या वाहनावर 'पोलीस', किंवा पोलिसांचं बोध चिन्ह लावत असतात. जेणेकरून समोरील व्यक्तीवर आपली धाक बसावी, यासाठी अनेकजण याचा वापर करतात. तर काहीजण आपल्या वाहनाला कोणी अडकवून नये,यासाठी त्याचा वापर करत असतात.

आता अशी वाहने आढळल्यास त्यावर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकी जाधव (पत्रकार) यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी खाजगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलिस" लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.