फीभरल्या शिवाय परीक्षेला बसता येणार नाही? MBBS च्या विध्यार्थीनीने संपवल जीवन
वर्ध्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पूजा रजानी, असं मृत मुलीचं नाव आहे. पूजाने स्वःला का संपवलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह सावंगी पोलीस रूग्णालयात दाखल झाले आहे. विद्यार्थ्यांची कॉलेज प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.
नातेवाईकांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप
वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थीनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर विद्यार्थीनीच्या आई वडिलांनी व्यवस्थानावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण पुढे करून विद्यार्थीनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई आणि मामा यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.