एक KISS द्या, हजरी लावायचं माझं मी बघतो :, कॉलेज व्यवस्थापकाचा चावटपणा शिक्षिकेने केला उघड, Video व्हायरल
कॉलेज मॅनेजर आणि महिला प्राचार्यांचा महाविद्यालयाच्या कार्यालयातील
अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा उत्तर प्रदेशातील
उन्नावमधल्या महाविद्यालयात व्यवस्थापकाचा महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य
करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
25 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये व्यवस्थापक रवि प्रताप गोयल महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत. सदर
घटना उत्तर प्रदेशामधील उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी इंटर कॉलेजमध्ये
येथे घडली आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेज व्यवस्थापक अश्लील हावभाव करत महिला
शिक्षिकेकडून किस (KISS) ची मागणी करताना दिसत आहे. या महिला शिक्षिका
व्यवस्थापकाजवळ अर्ध्या दिवसाची रजा मागण्याकरीता गेल्या होत्या. त्यावर
माझी अट पूर्ण केल्यास अर्धा दिवस रजा मिळेल असे व्यवस्थापकाने सांगितले.
व्यवस्थापकाने अटची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने कोणती अट असे विचारले असता, व्यवस्थापकाने गालाकडे बोट दाखवत किस करण्याची मागणी केली. तसेच फक्त एक किस करा आणि हजेरीची चिंता संपवा असेही म्हटले. व्यवस्थापकाच्या या बोलण्यावर शिक्षिकेने स्पष्ट नकार देत, अशा अश्लील अटी मान्य होणार नसल्याचे सांगितले. महिला शिक्षिकेने व्यवस्थापकांचा व्यभिचारी प्रकार समोर आणण्यासाठीच हा व्हिडीओ केला असल्याचे म्हटले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.