Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

EVM घोटाळा...? भाजपाला फायदा...! पहा लोकसभा निवडणुकीच्या कोणत्या जागेवर काय आलेत आकडे

EVM घोटाळा...? भाजपाला फायदा...! पहा लोकसभा निवडणुकीच्या कोणत्या जागेवर काय आलेत आकडे
 
 

एप्रिल - मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएने स्पष्ट बहुमत प्राप्त करत देशात सरकारची स्थापना केली आहे. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या डेटावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या रोजी मतमोजणी करताना फेरफार करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी मतमोजणी करण्यात आली आहे असा आरोप ADR, VFD या संस्थांनी केला आहे. केंद्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सादर करण्यात आलेल्या डेटावर अभ्यास करून या संस्थांनी मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणात ADR आणि पत्रकार पुनम अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणताही उत्तर यांना मिळालेला नाही. यामुळे आता निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
तर महाराष्ट्राची संस्था व्होटिंग फॉर डेमोक्रॅटिक (VFD) च्या नुसार 7 टप्प्याच्या वोटिंग टर्नआउट आणि फायनल डेटामध्ये पाच कोटी हून जास्त मताचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे फायनल डेटामध्ये पाच कोटी पेक्षा जास्त मताचा अंतर कसं? येऊ शकतो असा प्रश्न आता निवडणूक आयोगाला विचारण्यात येत आहे. तसेच काही टप्प्यात वोटिंग शेअर तीन टक्के तर काही टप्प्यात वोटिंग शेअर 5 टक्क्यांनी वाढले आहे तर आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये हा आकडा 12% पर्यंत असल्याचा आरोप देखील VFD कडून करण्यात आला आहे.

यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाला असून त्यांना 75 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला असल्याचा दावा देखील VFD कडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या मुद्द्यावर लोकप्रिय पत्रकार रविष कुमार यांनी स्पेशल शो प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर याबद्दल प्रकाशित केलेला व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे. एकूणच या आकडेवारीत असा घोळ पुढे आल्याने इलेक्ट्रॉनिक मतमोजणी यंत्र आणि त्यांच्याद्वारे होणारा निवडणूक घोटाळा पुन्हा चर्चेत आलेला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.