Breaking News! लाडकी बहीण योजनेला उच्च न्यायालयात आव्हान
राज्य सरकारची माझी लाडकी बहिण योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहिण योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्य सरकारकडून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण आता या योजनेला आव्हान दिल्यानेच या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंट यांनी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाकडे यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. राज्यातील करदात्यांच्या पैश्यांचा अपव्यव करण्य़ासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येत असून या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडणार असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.दरम्यान, येत्या 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून देण्यात येणाऱ्या या योजनेच्या पहिल्या हफ्त्यावर तात्काळ स्थिगीतीची द्यावी, असी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणीस एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास आणि योजनेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. येत्या मंगळवारी या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.