Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! शिरोळ मध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला :, 8 जणं वाहून गेले, 3 नां वाचवण्यात आले यश

Breaking News! शिरोळ मध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला :, 8 जणं वाहून गेले, 3 नां वाचवण्यात आले यश
 
 

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर  जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आलाय. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. शिरोळ तालुक्यातील बस्तवड गावालाही चौहेबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालंय.
अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून 8 जण प्रवास करीत होते. त्याचवेळी बस्तवड - अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले.

यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अजूनही ५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय. सध्या बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.