Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्यांची उंची किती ते बोलतात किती?' राणेंना पोलीस बॉईज संघटनेने घेरले

'त्यांची उंची किती ते बोलतात किती?' राणेंना पोलीस बॉईज संघटनेने घेरले
 

भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलीस बॉईज संघटना भलतीच आक्रमक झाली आहे. त्यांनी पोलीसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पोलीस बॉईज संघटनेत त्यांच्याबाबत चिड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेकडून नितेश राणे यांना बांगड्यांचा आहेर पाठवला जाणार आहे. शिवाय जो कोणी असे करेल त्याला पन्नास हजाराचे बक्षिस ही देण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस बॉईज संघटनेने केली आहे.

पोलीसांनो मस्ती करायल तर याद राखा, अशा ठिकाणी बदली करू ज्या ठिकाणाहून बायकोलाही फोन लागणार नाही अशी थेट धमकीच भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली होती. त्यांच्या यावक्तव्याचे पडसात सर्वत्र उमटत आहेत. पोलीस बॉईज संघटनेने तर याचा निषेध केला आहे. अकोल्यात तर राणे यांना काळे झेंडेही दाखवले गेले. आता या पुढे नितेश राणे दिसतील तिथे त्यांना बांगड्या दिल्या जाणार आहे. शिवाय असं जो कोणी करतेल त्याला पन्नास हजाराचे बक्षिसही जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिली आहे.

नितेश राणेंना पोलीसांना नाव ठेवायचा आजार झालाय. त्यांची उंची किती हे बोलतात किती? पोलीस आणि त्यांच्या पत्नींचा अनादर करण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला असा प्रश्नही संघटनेच्या वतीने विचारण्यात आला आहे. सीमेवरच्या जवानापर्यंत आमचा बाप ड्युटी करतो, तिथे मी फोन लावू शकतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही एकदा असं बोलले होता की माझं कुठलाही पोलीस कर्मचारी काय वाकडं करू शकत नाही. याबाबतही संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.

लव्ह जिहाद प्रकरणात पोलीस योग्य सहकार्य करत नाहीत असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. तसं जर पोलीस करत असतील तर त्यांची बदली अशा ठिकाणी करू जिकडे फोनही लावता येणार नाही असा इशारा त्यांनी जाहीर पणे दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टिका झाली होती. आता तर पोलीस बॉईज संघटनेने आक्रमक भूमीका घेत त्यांच्या विरूद्ध मोहीमच उघडली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.