शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा : निता केळकर
सांगली, ता. ८ : माजी खासदार राजू शेट्टी यांनी अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने आक्रमक भूमिक घेण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार केली आहे. याबाबतचे निवेदन विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांना दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी वरिष्ठांच्या सूचनेनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
श्री. शेट्टी यांचा अकोला येथे शेतकरी मेळावा होता. त्यावेळी त्यांनी 'काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून लोकांनी काहीतरी शिकावं असं म्हणत थेट पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा भाजपकडून तीव्र निषेध केला जात आहे. शेट्टी यांच्या विरोधात नीता केळकर यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रारच दिली आहे.
सौ. केळकर म्हणाल्या, ""राजू शेट्टींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. भारतीय न्याय संहिता १२४ (A) अन्वेय गुन्हा दाखल करवा. पंतप्रधानांचा अवमान खपवून घेणार नाही. गुन्हा नोंद न झाल्या आक्रमक भूमिका घेतली जाईल."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.