Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यात पुन्हा हिट अँड रन, बड्या बापाचा मद्यधुंद मुलाने प्राध्यापिकेला उडवले

राज्यात पुन्हा हिट अँड रन, बड्या बापाचा मद्यधुंद मुलाने प्राध्यापिकेला उडवले
 

पुणे पोर्श प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने मद्याच्या नशेत दोघांना उडवले होते. तो पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्यानंतर नागपुरात दोन हिट अँड रनच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह यानेही एकाला उडवले होते. या प्रकरणांची राज्यात नाही तर देशभरात चर्चा झाली.मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाड्या चालवत बड्या बापाची मुले हिट अँड रन करत आहे. त्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. आता मुंबईत पुन्हा एक हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. त्यात एका प्राध्यपिकेचा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये हा अपघात झाला आहे.

भरधाव कारची धडक

विरारमध्ये हिट अँड रन घटनेत एका महिला प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आत्मजा राजेश कासट (वय ४६) असे या प्राध्यापिकेच नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्मजा कासट या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या टोयाटो फोर्च्युनर कारने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कारचालक बड्या व्यावसायिकाचा मुलगा
कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. शुभम पाटील (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. तो विरारच्या एका मोठ्या व्यावसायिकचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा कलम 105,281,184,185, असा गुन्हा दाखल केला आहे. शुभम पाटील याला अटक केली आहे.

वरिष्ठ निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी कार चालक शुभम प्रताप पाटील हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.