Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभिषेक बच्चन -ऐश्वर्या राय यांच्या घटस्फ़ोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?

अभिषेक बच्चन -ऐश्वर्या राय यांच्या घटस्फ़ोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?
 

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात काहीतरी वाद सुरु आहेत अशा जोरदार चर्चा आहेत. एवढेच नव्हे दोघांचा घटस्फोट होणार असल्याचेही बोलले जात आहे.
 
कारण गेल्या काही काळापासून दोघांनी ना एकत्रित फोटो शेअर केलाय ना एकत्रित दिसलेत. यावरुनच नात्यात धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांनी जोर पकडलाआहे. दरम्यान, अभिषेक किंवा ऐश्वर्याने अद्याप अफवांवर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एका डॉक्टरमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकचे घटस्फोट होणार?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या अफवांदरम्यान एका डॉक्टरचे नाव समोर येत आहे. हा डॉक्टर अभिनेत्रीचा खास मित्र आणि मनोचिकित्सक आहे. डॉ. झिरक मार्कर असे त्याचे नाव आहे. बॉलिवूडच्या काही रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि सिराक यांची खूप चांगली मैत्री आहे. हेच कारण ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटासाठीचे कारण असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.

ऐश्वर्या आणि सिराकचे फोटो व्हायरल

ऐश्वर्या राय आणि सिकारचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वर्ष 2016 मध्ये सिराकने 'पेरेंटिंग इन द एज ऑफ एंग्जायटी' नावाच्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले होते. यावेळी ऐश्वर्याने देखील उपस्थिती लावली होती. येथे ऐश्वर्याने सिराकाला किस केले होत. हेच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिराक मार्कर आणि ऐश्वर्या गेल्या 20 वर्षांपासून एकमेकांना ओखळतात.

अभिषेकने घटस्फोटाची पोस्ट केली होती लाइक
 
अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर एक रिलेशनशिप आणि घटस्फोटासंबंधित पोस्ट लाइक केली होती. यामध्ये घटस्फोट घेणे किती वेदनादायक असू शकते अशा आशयाचा मेसेज पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. यानंतरही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अधिक दाट होऊ लागल्या. एवढेच नव्हे अंबानींच्या लग्नसोहळ्यातही अभिषेकने ऐश्वर्याला दुर्लक्षित केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अंबानींच्या लग्नसोहळ्यात लेकीसोबत आली ऐश्वर्या

बच्चन परिवाराने अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. पण ऐश्वर्यासोबत बच्चन परिवार दिसला नाही. ऐश्वर्या अंबानींच्या लग्नात लेकीसोबत आली होती. दरम्यान, वर्ष 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह झाला होता. यानंतर वर्ष 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.