डॉक्टरानीं हॉस्पिटलमध्येच स्वतःला संपवल :, वैद्यकिय क्षेत्रात खळबळ
सातारा : कराड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फायनान्स कंपनी आणि बँका यांच्या कर्जाच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून डॉक्टरांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. हेमंत रेळेकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
कराड तालुक्यातील ओंड येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी डॉ. हेमंत रेळेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते. ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल आहे. तर पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा, मुलगी असे परिवारासह रहात होते. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळी डॉ. हेमंत रेळेकर यांनी आवरुन नेहमीप्रमाणे आपल्या दवाखान्यात आले. त्यानंतर बराच वेळ झाला ते घरी पतरले नाही. हेमंत रेळेकर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दवाखान्यात जाऊन पाहिलं असता त्यांना एका खोलीत डॉ. हेमंत रेळेकर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
कुटुंबियांचा आरोप काय?
कराड तालुक्यातील ओंड येथे ही घटना घडली आहे. डॉक्टर हेमंत रेळेकर यांच्या फायनान्स कंपनी आणि बँका यांचे कर्ज होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी फायनन्स कंपनी आणि बंकेकडून सारथा तगादा लावला जात होता. अखेर या सर्वांचा त्रास अनावर झाल्याने डॉ. हेमंत रेळेकर यांनी रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली.फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्रास दिल्यानं ही आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे अडीच कोटींच कर्ज डॉक्टर हेमंत रेळेकर यांच्यावर होतं, अशी माहिती मिळत आहे. याच कर्जाच्या परतफेडीसाठी बँका आणि फायनान्स कंपन्यांची लोकं त्यांना फोन करत होती. हे कोण कर्मचारी आहेत. याच्या बाबत पोलीस तपास करत असुन लवकरच याबाबत आम्ही निष्कर्षापर्तंत पोहोचु, असं पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.