धक्कादायक तीन महिन्यापूर्वी लग्न झाले, पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले आणि एकाच दोरीला लटकून जीवन संपविले !
हातावरची मेहंदी उतरली आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या काळात नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयाने संपूर्ण गाव हादरले आहे. संगमनेरच्या साकुर गावात नवविवाहित दाम्पत्याने अचानक टोकाचा निर्णय घेतला. तीनच महिन्यांपूर्वी लग्न झाले, अन पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले, आणि एकाच दोरौला लटकून या दोघीनीही जीवन संपवले.
ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यांतील साकुर गावात घडली आहे, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे, वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) अशी नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत. वैभव आणि स्नेहा यांचे अवघ्या तीनच महिन्यापूर्वी लग्न झाले होते, मात्र या नवविवाहित दाम्पत्याने रविवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेवून जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच घारगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही. वैभव व स्नेहा दोघेही पुण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेर येथील आपल्या गावी परतले होते. रविवारी संध्याकाळी या दोघांनीही एका झाडाला दोरी बांधून एकत्रच जगाचा निरोप घेतला. आमले दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याने संगमनेर तालुक्यांसह साकुर गावामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.