आदोंलकांनी शेख हसीना यांच्या घरात घुसून त्याचं खाजगी सामान लुटले :, रस्त्यावर येऊन केला ' असा' तमाशा
बांगलादेशमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी थेट पंतप्रधानांचं निवासस्थान गाठून त्यांच्या घरामध्ये शिरकाव केला. आतमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी जाळपोळ, नासधूस आणि तोडफोड केली. याचेही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दुसरीकडे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने बांगलादेशातून पलायन केलं. त्या भारतात दाखल झाल्या आहेत. पुढे त्या लंडनला जातील, असं सांगितलं जातंय. तर बांगलादेशमध्ये लष्कर प्रमुखांच्या पुढाकाराने अंतरिम सरकार स्थापन होणार आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसलेल्या आंदोलकांनी आतमध्ये दिसेल ते लुटायला सुरुवात केली. एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक आंदोलक निर्लज्जपणे हाता ब्रा घेऊन उंचावत आहे. त्या व्यक्तीने केलेला कारनामा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काही व्हिडीओमध्ये आंदोलक हे शेख हसीना यांच्या निवासस्थानातून सर्वच प्रकारच्या वस्तू लुटून नेताना दिसत आहेत. त्यांच्या निवासस्थानातून साड्या लुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती डोक्यावर ट्रॉली बॅग घेऊन फिरताना दिसतोय. ती बॅग साड्यांनी भरलेली असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येतोय. एका फोटोने तर कहरच केला. एका आंदोलकाने चक्क चोरलेली साडी अंगावर नेसली. हा फोटोतर सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला आहे.दरम्यान, बांगलादेशातून परागंदा झालेल्या शेख हसीना या सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील गाझियाबादजवळ असलेल्या हिंडन हवाई तळावर उतरल्या. बांगलादेश हवाई दलाच्या सी-१३० जे मालवाहू विमानाने त्या येथे आल्या. येथून त्या लंडनला जाणार असल्याचे राजनैतिक सूत्रांनी सांगितले. त्या याच विमानातून लंडनला जाणार की वेगळ्या विमानाने, हे स्पष्ट झालेले नाही. हसीना यांच्या कन्या सायमा वाझेद या दिल्लीतच राहतात. त्यांचीही भेट त्या घेण्याची शक्यता आहे. सरकारकडून मात्र हसीना यांच्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, हसीना यांना दुसऱ्या देशात निघून जाण्यासाठी हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी भारत सरकारने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.