Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार आवाडेंचा महायुतीला दे धक्का; माघार घेत तीन उमेदवार देण्याची केली घोषणा

आमदार आवाडेंचा महायुतीला दे धक्का; माघार घेत तीन उमेदवार देण्याची केली घोषणा
 

महायुतीतील घटक पक्ष असलेले ताराराणी आघाडी पक्षाचे इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीला धक्का देत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत:ची माघारी जाहीर करीत पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. उमेदवारीसाठी कोणाकडे जाणार नाही. अशा शब्दात आमदार प्रकाश आवाडे यांनी घोषणा करीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील रणशिंग फुंकले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी आज येथे केली. उमेदवारीसाठी कोणाकडे जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीकडून सन्मानाने उमेदवारी मिळाल्यास ती स्वीकारली जाईल, अन्यथा इचलकरंजीसह तीन विधानसभा क्षेत्रात स्वत:च्या ताराराणी पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचीही घोषणा आमदार आवाडे यांनी केली.

जिथून आलो तिथे परत जाणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेलाही पूर्ण विराम दिला आहे. महायुती मधील भाजप शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले  लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे इ्च्छुक होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने त्यांनी माघार घेतली होती. धैर्यशील माने यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात प्रकाश आवाडे यांच्या घरी पोहोचले होते.
प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. त्यामुळे आवाडे यांनी आपली तलवार म्यान केली होती. एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये झालेली कोंडी फोडण्यात यश आलं होते.

अपक्ष राहिल्यास भाजप-शिवसेनेची वाट रिकामी
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार अपक्ष आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील इच्छुक आहेत.

उमेदवारीचा मार्ग सुकर करण्यासाठी हळवणकर यांना विधान परिषदेचा पर्याय उपलब्ध आहे. जर त्यावर तोडगा न निघाल्यास आमदार प्रकाश आवडे हे आपल्या मुलाला विधानसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरवू शकतात. जर अपक्ष म्हणून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे गेल्यास भाजपकडून सुरेश वाळवणकर किंवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.