काळी नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ आहे. हा पूल १९८३ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाजवळच प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे. कर्नाटकातील कारवार शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या वेळी पुलावरून जाणारा ट्रक नदीत पडला. मात्र, नंतर स्थानिक मच्छिमारांनी ट्रकचालकाची सुखरूप सुटका केली. परंतु या दुर्घटनेत ट्रक चालक जखमी झाला आहे.
दरम्यान, काळी नदीवरील हा पूल कोसळला असून रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. काली नदीवरील जुना पूल कोसळल्यानंतर बुधवारी पहाटे काही काळ नवीन पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. जुन्या पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाजवळ अडकण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदरी घेतली जात आहे.याठिकाणी एसडीआरएफची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका असण्याची शक्यता आहे का? याची तपासणी केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.