सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला ही विडी कामगार आहे.
आरोपीला अटक
या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली आहे, आरोपीने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. बालाजी नल्ला असं या महिलेवर अत्याचार केलेल्य आरोपीचं नाव आहे. वळसंग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.