शेख हसीनांना आश्रय दिल्याने बांग्लादेशातून भारताला इशारा,'... तर होईल कठीण '
बांगलादेशातील आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. मात्र, हसीन यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी खलेदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) भारतावर नाराजी व्यक्त केली आहे.
खलिदा झिया यांचा पक्ष बीएनपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गायेश्वर रॉय यांनी आम्ही बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंधांना समर्थन देतो. परंतु आमच्या शत्रूला मदत करत असाल तर कठीण होईल, असा शब्दांत इशारा दिला.
गायेश्वर रॉय यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला ते म्हणाले, अशा परिस्थितीत परस्पर सहकार्य कठीण होत आहे. भारत शेख हसीना यांना पुन्हा सत्तेवर आणेल याची आम्हाला काळजी वाटत आहे. शेख हसीना यांची जबाबदारी भारत उचलत असल्याचेही गायेश्वर रॉय म्हणाले.भारत आणि बांगलादेशच्या जनतेला एकमेकांशी काही अडचण नाही पण भारताने केवळ एका पक्षाला (अवामी लीग) उचलून धरले. संपूर्ण देशाचा विचार का नाही करत?, असा सवाल देखील राॅय यांनी उपस्थित केला आहे. शेख हसीना या भारतात असल्या तरी त्या त्यांना युरोपामधील देशात आश्रय मिळेल का? याची चाचपणी करत असल्याचे सांगितले जात आहे.
मोदींनी केले मोहम्मद युनूस यांचे अभिनंदन
नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या सरकारचे प्रमुख बनवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायांच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.