बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन:, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्याकडून शोक व्यक्त
बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रदीप बांदेकर यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम बॉलीवूड पापाराझी वरिंदर चावलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली.
वरिंदर चावला यांनी एका भावनिक पोस्टमध्ये लिहिले की, 'आजचा दिवस इंडस्ट्रीसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. कारण आम्ही दिग्गज फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांना मगानवे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ते फक्त एक मार्गदर्शक नव्हते तर त्यांनी मला मुलासारखे वागले.त्यांच्या जाण्याची पोकळी कधीही भरली जाऊ शकत नाही.'
प्रदीप बांदेकर यांच्या निधनाने बॉलीवूड जगतात शोककळा पसरली असून, त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांची ही मोठी हानी आहे. त्यांनी त्यांच्या छायाचित्रांमुळे आणि कामामुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांवर प्रभाव पडला होता. बॉलिवूड फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांचा मृत्यू
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.