ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध
जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची वाढ झाली आहे. या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातात. कँसर हा एक गंभीर आजार आहे. जगभरातील रुग्णांची वाढती संख्या पाहत हा एक चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे.
या धोकादायक आजारांचे निदान झाल्यानंतर वेळीच औषध उपचार घेतले नाहीतर रुग्णांनाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. शरीरातील कोणत्याही भागात कॅन्सर होण्याची भीती असते.कॅन्सरचे 200 पेक्षा जास्त वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील सगळ्यात गंभीर कॅन्सर म्हणजे ब्लड कॅन्सर.
ब्लड कॅन्सर झाल्यानंतर रक्त आणि अस्थिमज्जावर परिणाम होण्यास सुरुवात होते. क्तपेशींच्या डीएनएमधील बदल आणि उत्परिवर्तनांमुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो. जगभरात ब्लड कॅन्सरच्या तीन प्रकारचे रुग्ण आहेत. रक्ताचा कर्करोग, लिम्फोमा आणि मायलोमा. त्यामुळे या आजाराची लक्षणे ओळखणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सतत थकवा किंवा श्वास घेण्यास सुरुवात होते. लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशक्तपणा आणि थकवा आल्यामुळे त्वचा पिवळी दिसू लागते. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर कोठेही लाल पुरळ, जखम होणे इत्यादी समस्या दिसून येतात. प्लेटलेट्सचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्वचेवर जखमा होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातून अनावश्यक रक्तस्त्राव होतो.शरीरामध्ये पांढऱ्या आणि लाल पेशींची कमतरता निर्माण झाल्यानंतर ताप किंवा कोणताही संसर्ग होण्याची शक्यता असते. रक्त पेशी कमी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. लिम्फ नोड्समध्ये कर्करोगाच्या पेशींचा असामान्यपणे विकसित होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे शरीरातील कोणत्याही भागात सूज येते. मान, बगल किंवा मांडीचा सांधा यांसारख्या भागात सूज आल्यानंतर अनेक वेदना होतात. शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण झाल्यानंतर हळूहळू वजन कमी होण्यास सुरुवात होते. तसेच रात्रीच्या वेळी घाम येतो. कॅन्सरच्या कॅटाबॉलिक स्वरूपामुळे भूक कमी होऊन वजन कमी होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.