कोल्हापूर : "दोन वर्षापासून माझ्याशी कोणतेही रिलेशन तू ठेवले नाहीस", असे दारूच्या नशेत म्हणत घरात घुसून एका महिलेला "माझ्याशी रिलेशन ठेव नाहीतर तुला आणि तुझ्या घरातील सवार्नाच संपवून टाकेन आणि मी स्वतःही मरणार" असे बोलत शिविगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी एका पोलिस अंमलदाराविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अझर खतीब असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. संशयित खतीब हा हेरले (ता. हातकणंगले) येथे राहण्यास आहे. त्याची वडगाव येथील एका महिलेशी फेसबूक या सोशल मिडियावरून ओळख झाली. ही ओळख वाढल्यानंतर खतीबचे महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. खतीब वारंवार घरी येत असल्याने पीडित महिलेने त्याला घरी येऊ नको असे सांगितले होते. तरीही तो महिलेच्या घरी जात होता. त्यानंतर महिलेने याबाबत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांना माहिती दिली.तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी पोलिस ठाण्यात जाऊन खतीब याला समज दिली होती. त्यानंतर चिडलेल्या खतीब याने पीडित महिलेला भेटून तसेच फोन करून जिवे मारण्याची धमकी देत होता. बुधवारी रात्री पीडित महिला कोल्हापूर येथे आईचे औषध आणण्यासाठी गेल्यानंतर खतीब तिच्या घरात घुसला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी त्याने पीडित महिलेसह तिची आई आणि मुलीसमोर माझ्याशी रिलेशन ठेव नाहीतर तुला आणि तुझ्या घरातील सर्वाना संपवून टाकेन तसेच मी स्वतःही मरेन अशी धमकी दिली. त्यानंतर महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार खतीब याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.