जयंत पाटलांनी राज ठाकरे यांना एका वाक्यात सुनावलं
पुणे: मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. पण, 'मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात ते कुणाचं ऐकत नाहीत सल्ला मानून काम करत नाही.
मला वाटत यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं म्हणत राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी विधान केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.
मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात ते कुणाचं ऐकत नाहीत सल्ला मानून काम करत नाही. मला वाटत यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं म्हणत पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
परमबीर सिंग यांच्या आरोपाला उत्तर
तसंच, 'मी कधीच असं कुणालाही सांगतील नाही ते काय बोलत आहेत या विषयी मला जरा देखील माहिती नाही ते काय म्हणत आहेत काशब्दल बोलतात आणि मी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या बद्दल सांगायला माझा संबंध कुठे येतो. मी गृहमंत्री होतो का मी का त्यांना सांगू. पार्टी कधीच कुणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाले आहे. आरोप होऊन किती वर्ष झाली. 3 वर्षांनी काही गोष्टी एकदा माणूस सांगत असेल तर त्याकडे किती लक्ष द्यायचं. फक्त परमवीर सिंग यांच्यावरची चौकशी सुरू आहे ती व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा, असं म्हणत जयंत पाटील यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांना उत्तर दिले.
नाशिक महिंद्रा प्रकल्प
'गुजरातला काही जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमच्या सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाही आमचे अनेक प्रकल्प तिकडं गेले आहेत आमच्या सरकारने कधीच थांबवलं नाही' असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली.
जागावाटपाबद्दल बैठक कधी?
विधानसभा जागावाटपासाठी एक बैठक झाली आहे. अजून एक दोन बैठका होतील आणि लवकर निर्णय होतील बहुत काय होते, असं म्हणत जागावाटपाबद्दल जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
' काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायचं आहे. शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरु आहे' अशी टीका राज ठाकरेंनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.