नवी दिल्ली : पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळीने नाव कोरले आहे. आणि पदकं देखील जिंकली आहे. यामध्ये कुस्ती खेळामध्ये विनेश फोगाट हीचे देखील पदक निश्चित झाले आहे. मागील काही काळापासून कठीण प्रसंगातून जात असलेल्या भारतीय कुस्तीपट्टूंनी हा विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहे. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लक्षवेधी पोस्ट केली आहे.
50 किलो वजनाच्या कुस्तीच्या अंतिम सामन्यापर्यंत विनेश फोगाट गेली आहे. महिला कुस्तीच्या फायनलमध्ये जाणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. सेमीफायनलमध्ये तिने बाच्या युसनेलिस गुजमॅन लोपेजवर एकतर्फी विजय मिळवला. 5-0 असा विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. विनेशचे पदक निश्चित झाले असून तिच्याकडून सुवर्ण पदाकाची अपेक्षा केली जात आहे. या विजयानंतर देशभरामध्ये अनोखा उत्साह दिसून येत आहे. यामध्ये आता काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते यांनी सोशल मीडियावर विनेश फोगाट हिला शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींच्या शुभेच्छा
राहुल गांधी यांनी विनेश फोगाट हिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश व तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष नाकारला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवर प्रश्नही उपस्थित केले, त्यांना उत्तरे मिळाली आहेत. तिला रक्ताचे अश्रू रडवणारी संपूर्ण सत्ताव्यवस्था आज भारताच्या शूर कन्येसमोर कोसळली आहे. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुमच्या यशाची प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे, अशी सोशल मीडिया पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.
प्रियांका गांधी शुभेच्छा
राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत विनेश फोगाट यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. शाब्बास ! मला माहित आहे की तुमच्यासाठी ही केवळ एक कठीण ऑलिम्पिक स्पर्धा नाही. तुम्ही केवळ जगातील नंबर वन खेळाडूला पराभूत केले नाही तर हा तुमच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील संघर्षाचा विजय आहे. आज संपूर्ण जग तुमच्या हातात तिरंगा फडकताना पाहत आहे. तुम्ही या देशाची शान आहात आणि नेहमीच राहाल. हार्दिक शुभेच्छा. जय हो! विजय हो!' अशा शुभेच्छा प्रियांका गांधी यांनी दिल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.