मुनव्वर फारुकीने हात जोडून मागितली कोकणवासियांची माफी, नेमकं काय म्हणाला?
मुंबई : प्रसिद्ध स्टॅण्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या वादात सापडला आहे. त्यानं कोकणी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय ज्यामुळे वातावरण तापलंय. त्याच्यावर टीकेची झोड होत आहे. भाजप आणि शिंदे गटानं यावर आक्षेप घेताच मुनव्वरनं माफी मागितली आहे.
वाद पेटताना पाहून आणि भाजप, शिंदे या दोन्ही गटानं त्याच्यावर टीकास्त्र सोडताच मुमुनव्वरनं त्याच्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली. आपला कुणाचाही अपमान करण्याचा उद्देश नव्हता म्हणत फारूकीनं माफी मागितली.
नेमकं प्रकरण काय?
मुनव्वर फारुकी स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये कोकणी लोकांविषयी वक्तव्य केलं. तळोजा येथील परफॉर्मन्सदरम्यान त्यानं केलेल्या विधानामुळे वाद पेटलाय. या शोच्या व्हिडिओमध्ये मुनव्वर म्हणतो 'कोकणी लोक चू# बनवतात...' त्याच्या या वक्तव्यावर हशा पिकला आहे. मात्र, ही कॉमेडी सर्वांनाच आवडला नाही आणि कॉमेडियन एका नव्या वादात सापडला.
https://x.com/munawar0018/status/1823040763313397938
मुन्नावर फारुकीच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी ट्विट करत त्याच्यावर टीका केली. X वर पोस्ट शेअर करत नितेश राणे म्हणाले, 'या हिरव्या सापाला घरी जाऊन कोकणातले लोक कशी असतात हे सांगायला लागेल.. मग stand up पण मालवणीत सुरू करेल !'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.