बारामतीत अनेक जणांना मांजा कापला, पोलीसांनी मांजा बाळगण्यावर केली कारवाई
बारामतीत काल रंगपंचमीच्या नागपंचमीच्या निमित्ताने पतंगबाजी जोरात झाली, मात्र प्रतिबंधित असूनही चायनीज अथवा नायलॉन मांजाचा वापर मात्र टळला नाही. त्यामुळे अनेक दुचाकीचालक या मांजाच्या जीव घेण्या चक्रव्यूहात अडकले.
काहीजण अगदी थोडक्यात बचावले. त्यानंतर शहरांमध्ये याची जोरात चर्चा सुरू झाली आणि बारामती शहर पोलिसांनी जागोजागी धाडी टाकल्या.
बारामती शहरातील व्यावसायिक अनिल पयगुडे यांना दुपारच्या वेळी घरी जात असताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेजवळ दुचाकी ला मांजा अडकला आणि तो थेट गळ्यापर्यंत पोहोचून त्यांचा गळा चिरला गेला. ते गंभीररित्या जखमी झाले. या घटनेला काही वेळ जात नाही तोच लागलीच एक युवकाला देखील गालावरती माझ्या कापला आणि त्याला गालावरती जबर मोठी जखम झाली.त्याच्यावर जवळपास दोन तास शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर गुणवडी चौकानजीक निकम यांनाही मांजाचा फटका बसला. तेही थोडक्यात बचावले. त्यानंतर अनेक जणांनी चायनीज अथवा नायलॉन मांजाची तक्रार केली. दोन दिवसांपूर्वी प्रतिबंधित असलेल्या मांजाची साठा अथवा विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यास छापा टाकून त्याच्याकडील मांजा जप्त केला व त्याच्यावर कारवाई केली होती. मात्र या कारवाईचा इतर ठिकाणी काहीच परिणाम झाला नाही.
यानंतर मात्र बारामती शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठवून जिथे जिथे हा मांजा उडवला अथवा बाळगला जात आहे, तिथे तिथे नजर ठेवली. त्यावरून साठेनगर येथील सनी दळवी, जामदार रोड येथील श्रीपाद चंद्रकांत ढवाण, साठेनगर येथील चेतन लोखंडे या तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 प्रमाणे गुन्हा दाखल केला अशी माहिती बारामती शहर पोलिसांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.