Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा

विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा
 
 

आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, प्रस्थापित आणि बलदंड व्यवस्थेविरोधात आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर लढणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले आहे.
विनेश फोगाट हिचे वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले. विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, असं वाटून कुणी सूत्रे हलवली का? असा संशय जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावर हा निशाणा साधला आहे.

तसेच ते म्हणाले, आपल्या न्याय हक्कांसाठी विनेशने आंदोलन केले होते. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल असे कोणाला वाटले का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांच्या वक्तव्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये फायनलला धडक मारली होती. विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युस्नेलिस गुजमान लोपेलचा पराभव केला होता. सुवर्णपदकापासून आता ती फक्त एक डाव दूर होती. मात्र त्या आधीच ही बातमी समोर आल्याने निराशा झाली. ५० किलो वजनी गटात विनेशचा अंतिम सामना आज रात्री दहा वाजता होणार होता.

ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती. मात्र आता वजन जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामुळे आता चाहत्यांना मोठी निराशाजनक बातमी ही आली आहे. ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तिने तीन कुस्तीपट्टूंना हरवून फायनल गाठली होती.
असे असताना मात्र आता वजन जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. यामध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.