Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! क्रेनंमधून पडता - पडता जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहीणी खडसे बचावले :, नेमकं काय घडलं?

ब्रेकिंग न्यूज! क्रेनंमधून पडता - पडता जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहीणी खडसे बचावले :, नेमकं काय घडलं?
 

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) राज्यभरात 'शिवस्वराज्य यात्रा' काढली आहे. या यात्रेची सुरूवात आजपासून ( 9 ऑगस्ट ) शिवनेरी किल्ल्यावरून होईल. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून खाली उतरताना मोठी दुर्घटना घडता-घडता टळली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख क्रेनमधून पडता-पडता बचावले आहेत. यात कोणालाही दुखापत झाली नाही.

नेमकं घडलं काय?

शिवनेरी किल्ल्यावरून 'शिवस्वराज्य यात्रे'ची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे , रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनच्या सहाय्यानं वरती गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत होती. त्यावेळी अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यानं ती एका बाजूला झुकली. तेव्हा, त्यातून खाली पडता-पडता जयंत पाटील, कोल्हे, खडसे आणि शेख बचावले. यानंतर हळू-हळू क्रेन खाली आणण्यात आली आणि सगळ्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आलं. यात कोणालाही दुखापत झाली नाही.

पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतून जाणार...
यात्रेबद्दल माहिती देताना जयंत पाटल यांनी सांगितलं होतं, "महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत.

हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून जाणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.