Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीलाच बनवलं कॉल गर्ल; मित्रांना घरी बोलवून करायचा घृणास्पद कृत्य

पत्नीलाच बनवलं कॉल गर्ल; मित्रांना घरी बोलवून करायचा घृणास्पद कृत्य
 

जयपूर : पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने पत्नीला कॉल गर्ल म्हणत आपल्या मित्राला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करायला लावला.

पत्नीची संमती नसताना तो स्वतःही अनेकदा तिच्यासोबत संबंध ठेवतो. पत्नीने नकार दिल्यास तो तिला बेदम मारहाण करतो. सततच्या त्रासामुळे ही महिला डिप्रेशनमध्ये गेली होती. पीडितेनं नंतर तिच्या कुटुंबीयांना आपला त्रास सांगितला. ही घटना कोटामधून समोर आली आहे.

त्यानंतर आरोपी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. आरोपी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यासोबतच तो वडिलांच्या व्यवसायातही मदत करतो. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास दादाबारी पोलीस करत आहेत. तपासात आणखी धक्कादायक खुलासे होऊ शकतात.

पोलीस उपअधीक्षक (प्रथम) राजेश टेलर यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध बलात्कार आणि मारहाण या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीने मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याने स्वतः त्याच्या मित्रासोबत मिळून पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपी पतीने मित्राला फसवून पत्नी कॉल गर्ल असल्याचं सांगून घरी बोलावलं होतं.

आरोपी पती पत्नीला इतर लोकांना कॉल करण्यासही सांगत असे. नंतर तो त्यांना घरी बोलवायला सांगायचा. आरोपी आणि पीडितेचा अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला एक मुलगीही आहे. असं असतानाही आरोपी अशा घटना घडवत होता. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. या प्रकरणात आणखी गंभीर खुलासे होऊ शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.