लाडकी ' बायको ' नसते तर लाडकी ' बहीण 'चं असते :, निर्लज्ज सरकारला महिला समजल्या नाही
पुणे : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध रंगताना दिसत आहे. शिंदे यांच्याकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' हे नाव वापरले जातेय तर अजित पवारांकडे मुख्यमंत्री हा शब्द वगळून 'माझी लाडकी बहीण योजना' हे नाव वापरले जात आहेम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेचा आपल्या पक्षाला कसा फायदा होईल आणि योजनेचा श्रेय कसे मिळेल यावर भर देताना दिसत आहेत. अर्थमंत्री मी (अजित पवार) आहे, म्हणून ही योजना लागू केल्याचे पवार सांगतात
‘माझी लाडकी बहीण योजना’ योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
सरकारच्या या योजनेवर शरद पवार गटाने चांगलाच समाचार घेतला आहे. मेहबूब शेख म्हणाले की,” बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं, लाडकी ‘बायको’ नसते तर लाडकी ‘बहीण’चं असते असे म्हणत अजित पवारांना टोमणा मारला. शरद पवार गटाच्या ‘शिवस्वराज्य यात्रा’ दरम्यान त्यांनी हे व्यक्तव्य केलं.पुढे बोलतांना मेहबूब शेख म्हणाले, वीस वर्षे दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना या नागांनी डसले आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी जे पेरलं ते का उगवलं नाही. आता ते लोक (अतुल बेनके) आपल्याकडे हेलपाटे मारत आहेत. त्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. पण जे लोकसभेआधी आले त्यांचं स्वागत केलं आहेच. पण जे उरलेत ते ‘अली बाबा चाळीस चोर’ आहेत.
आज नागपंचमी आहे, आज नागांना दूध पाजले जाते. पण पवार साहेबांनी ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला अन् दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना ते डसले.बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते. मग या सरकारला लाडकी बहीण आठवली.
निर्लज्ज सरकारला महिला समजल्या नाहीतच
लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय.आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. सरकारला वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ योजेनची पोलखोल केली.
सरकारची लाडकी खुर्ची योजना सुरू :
खासदर अमोल कोल्हे यांनीही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ योजनेवर टीका करत म्हणाले, ”राज्यात लाडकी खुर्ची योजना सुरू आहे. या लाडक्या खुर्चीसाठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरु आहेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आपण काढतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.