कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग; संपूर्ण थिएटर जळून खाक
कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग; संपूर्ण थिएटर जळून खाक
कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या भीषण आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं आहे. कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच कलाप्रेमीसाठी ही दुःखद घटना आहे.संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत खासबाग मैदानाचा स्टेज आणि त्याला लागूनच असलेलं थिएटर जळून खाक झालं आहे. या घटनेचा कॉल मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पण थिएटरला लाकडी बांधकाम मोठ्या प्रमाणावर असल्यानं आगीनं रौद्ररुप धारण केलं होतं. युद्धपातळीवर इथं आग विझवण्याचं काम सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.