Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदार नितेश राणे यांची पोलिसांची बदली करून दाखवावीच माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडणार; सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनची मागणी

भाजप आमदार नितेश राणे यांची पोलिसांची बदली करून दाखवावीच माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडणार; सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनची मागणी
 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या बदलीबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. राणे यांनी तातडीने पोलिस कुटुंबियांची माफी मागावी. तसेच त्यांनी पोलिसांची बदली करून दाखवावीच अन्यथा त्यांच्याविरोधात सेवानिवृत्त पोलिस संघटना, पोलिस बॉइज, पोलिस कुटुंबिय तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भाजप आमदार नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या विरोधात वाटेल तसे प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्र पोलिस दलाची बदनामी करत आहेत. नुकतेच त्यांर्नी सांगली जिल्ह्यातील पलूस येथे "गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर आहेत. ते आमचे बॉस आहेत. पोलिसांची बदली अशा ठिकाणी करेल की त्यांना त्यांच्या बायकोचा फोन लागणार नाही." असे वक्तव्य करून राणे यांनी पोलिसांना एक प्रकारे धमकीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे.

राणे पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरत आहेत. त्यामुळे त्यांचे या वक्तव्यावरून हा महाराष्ट्र नाही तर बिहार आहे असे भासवत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा कतर्व्यावरील पोलिस, सेवानिवृत्त पोलिस, पोलिस बॉइज, पोलिसांचे कुटुंबिय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन पोलिसांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. राणे यांनी यापूवीर्ती पोलिसांच्या पत्नीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले आहे. तरीही गृह विभागाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनाची प्रत पोलिस उपअधीक्षक (गृह) यांनाही देण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, महमद सनदी, सुनील भिसे, सुरेश पाटील, शंभूसिंग रजपूत, पांडुरंग मौटे, नंदकुमार दळवी, तुकाराम नानगुरे आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.