अखेर अनिल अंबानींचं नशीब पालटलं; 'या' तरुणामुळं पुन्हा ओसंडून वाहणार श्रीमंती...
एकिकडे मुकेश अंबानी आणि रिलायन्स उद्योग समुहाच्या एका फळीची व्यवसाय क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल सुरु असतानाच दुसरीकडे मात्र अनिल अंबानी हे त्यांचे बंधू आर्थिक संकटाला तोंड देताना दिसत होते. अनेक अडचणींवर मात करण्यासाठी अनिल अंबानी यांचे प्रयत्न सुरु असतानाच आता कुठे त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या या धाकट्या भावाचं नशीब पालटण्यास सुरुवात झाली असून, त्याची स्पष्ट चिन्हं पाहायला मिळत आहेत.
कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीसंदर्भात झालेल्या कराराच्या धर्तीवर हिंदुजा ग्रुपनं 2750 कोटी रुपये एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा केले आहेत. सोबतच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरनं नव्या सब्सिडियरी कंपनीचीही घोषणा केली आहे. ही घोषणा आहे रिलायंस जय प्रॉपर्टीज प्राइवेट लिमिटेड (RJPPL) या कंपनीसंदर्भातली.
13 ऑगस्टपर्यंत 8811 कोटी रुपयांचा मार्केट कॅप असणाऱ्या या कंपनीतर्फे शेअर बाजारात देण्यात आलेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट सेक्टरमध्ये कंपनीची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत. RJPPL ही रिलायन्स एनर्जी लिमिटेडची संपूर्णत: मालकी हक्क असणारी सब्सिडियरी कंपनी असून, 12 ऑगस्ट 2024 पासून या कंपनीची सुरुवात करण्यात आली.
अंबानींच्या या कंपनीच्या अधिकृत शेअरची रक्कम आहे 1,00,000 रुपये. 10 रुपये प्रति शेअर इतक्या दरानं 10000 इक्विटी शेअरमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. विविध भूखंड अधिग्रहण, सेल्स, लीज आणि त्यांचा विकास अशा कामांवर अनिल अंबानी यांची ही कंपनी भर देणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार अंबानींच्या या कंपनीच्या नावातच त्यांच्या मुलाच्या अर्थात जय अनमोल अंबानी याच्या नावाचा समावेश असून, आता अंबानींची ही पुढची पिढी त्यांना व्यवसाय क्षेत्रात नव्या यशशिखरावर नेण्यासाठी सज्ज झाली आहे असं म्हणावं लागेल. जय अनमोल यानं वयाच्या 18 व्या वर्षापासून रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये इंटर्नशिप सुरू केली होती. कामाचा आवाका आणि अनुभव वाढत गेला आणि त्यानं रिलायन्स निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्स या कंपन्यांच्या नियामक मंडळांमध्येही त्यानं आपली जागा मिळवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.