Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अत्यंत घृणास्पद! मंदिरात पॉर्न व्हिडिओ पाहत करत होता हस्तमैथुन; व्हायरल व्हिडिओनंतर लोकांचा संताप

अत्यंत घृणास्पद! मंदिरात पॉर्न व्हिडिओ पाहत करत होता हस्तमैथुन; व्हायरल व्हिडिओनंतर लोकांचा संताप
 

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये एका मंदिरात संतापजनक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती मंदिरामध्येच देवाच्या मूर्तीसमोरच अश्लील वर्तन करत होता. कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे.

व्यक्ती मंदिराच्या आत झोपला होता. यावेळी तो मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलंय. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने यासंदर्भातील व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका धार्मिक ठिकाणी अशाप्रकारचे कृत्य झाल्यामुळे लोकांनी रोष व्यक्त केला आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओ, गाझीयाबादमधील फरिदनगरमधील भोजपूर मंदिरातील आहे. पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती मंदिरातील देवाच्या समोरच झोपला होता. त्याच्या एका हातात मोबाईल आहे. तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहतोय. एका हातात त्याने मोबाईल पकडला आहे आणि दुसऱ्या हाताने तो अश्लील कृत्य करत आहे. आपण, मंदिरात आहोत याचे कसलेही भान त्याला नसते. अत्यंत किळसावाना असा हा व्हिडिओ आहे.

व्यक्तीच्या बाजूलाच आणखी एक व्यक्ती झोपलेला दिसत आहे. त्याचेही त्याला भान नाही. सदर प्रकार एका व्यक्तीने खिडकीमधून शूट केला आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ व्हायरल केला . व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी याप्रकरणात गुंतलेल्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत देखील पोहोचला आहे. त्यानंतर गाझीयाबाद पोलिसांनी व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याच पोलिसानी सांगितलं. दरम्यान, लोकांनी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.