अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज :, उद्धव ठाकरेचां हल्लाबोल
“शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे मोहरके आले. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुणे येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
“तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहे ते सांगा?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला.
‘टरबूज जाऊ द्या हो, त्याला खड्ड्यात घाला’
“सगळीकडे खड्डे आहेत. गडकरी म्हणत होते असे रस्ते बांधीन की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही. मुंबई गोवा मार्ग बघा. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. त्याचे फोटो काढा आणि त्यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्या, टरबूज जाऊ द्या हो. त्याला खड्ड्यात घाला” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘हे आमचं पाप होतं’
“संसद गळत आहे, ज्याने संसद बांधली. तोच या नदीवर काम करत आहे. कंत्राटदार माझा लाडका सुरू आहे. तोही गुजरातचा आहे. वर्षही झालं नाही संसद बांधून. ती गळायला लागली. मोदी काँग्रेसकडे 70 वर्षांचा हिशोब मागत आहेत. 70 वर्षात काय केलं. तुमने क्या किया विचारत आहात. ते काय विचारता. तुम्ही 12 महिन्यापूर्वी बांधललेली संसद गळत आहे. राम मंदिर गळत आहे. पेपर लिक होत आहे. त्याचा हिशोब द्या. मग काँग्रेसला विचारा. हे गळती सरकार आहे. आम्ही यांना पाठिंबा दिला होता. हे आमचं पाप होतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.