मनोज जरांगेनां कोर्टाने झापलं, अटक वॉरंटही रद्द केलं :, कोर्टात काय घडलं?
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पण सरकारी वकिलांनी अटक वॉरंट रद्द करण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना झापलं.
सुनावणीदरम्यान कोर्टाने असे सांगितले की, 'कोर्टाचा आदेश असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर राहिले नाही. त्यामुळे प्रकरण जुने आहे. त्याचा निपटारा लवकर होणे आवश्यक आहे. जरांगे यांनी समाज मध्यावर कोर्टाबाबत जे वक्तव्य केले आहे ते कोर्टासमोर सरकारी वकील यांनी आणून दिलं आहे. त्यांनी कोर्टाचा अवमान केला आहे पुन्हा तसं करू नये.'तसंच, 'कोर्ट कोर्टाच्या भूमिकवर ठाम आहे. अशा टिप्पणीमुळे मनोज जरांगे यांनी दक्षता बाळगावी कोर्टाबाबत कोणत भाष्य करू नये. मनोज जरांगे यांना गैरहजर राहिले म्हणून नवीन कायद्याप्रमाणे नेमल्या तारखेस अनुपस्थित सहज घेता येणार नाही कायदा आणि दंड लक्षात असणं आवश्यक आहे. मनोज जरांगे नवीन बंध पत्र देणे आवश्यक आहे.', असे देखील कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.