न्याची खरेदी ही भारतामधील खूप आधीपासून चालत आलेली बाब असून सोन्याच्या खरेदीला आजही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. घरामध्ये लग्नकार्य असो किंवा काही सणासुदीच्या प्रसंगांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याचा ट्रेंड आहे.
आपण मागील एक ते दीड वर्षापासून बघत आलो की सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्यापलीकडे गेल्याची स्थिती आहे. परंतु देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व तेव्हा सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आली व त्यानंतर मात्र सोन्याच्या किमतीमध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळाली आहे.
याच सोन्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर बरेच भारतीय दुबईमधून सोने खरेदी करण्याची इच्छा बाळगून असतात. कारण असे म्हटले जाते की भारताच्या सोन्याचे मार्केट किंवा सोन्याच्या दराच्या तुलनेमध्ये दुबईमध्ये सोन्याची किंमत खूप कमी आहे. परंतु दुबईतून जर सोने आणायचे असेल तर ते तुम्हाला निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आणता येत नाही. कारण या संबंधीचे देखील काही नियम आहेत. यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघू.
दुबईतून सोने खरेदी करून भारतात आणता येते?
जर याबद्दलची माहिती बघितली तर दुबईमध्ये सोन्याच्या किमती या भारतातील सोन्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहेत. परंतु दुबईतून तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त सोने खरेदी करून भारतात आणू शकत नाहीत. जर तुम्ही दुबईतून जी काही निश्चित मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली व तुम्हाला ते सोने भारतात आणायचे असेल तर त्याकरता मात्र तुम्हाला आयात शुल्क भरावे लागते आणि भारतीयांच्या माध्यमातून दुबईतुन सोने खरेदी केली जाते.भारताचा विचार केला तर जगातील देशांमध्ये सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. आता आपल्याला प्रश्न पडतो की भारताच्या तुलनेमध्ये दुबईत सोने स्वस्त का मिळते? यामागील प्रमुख कारण म्हणजे आयात शुल्क हे आहे.भारतामध्ये जर सोने आयात केले तर त्यावर आयात शुल्क आकारले जाते तर दुबईमध्ये सोन्यावर आयात शुल्क लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुबईत जे काही सोने विक्री केले जाते त्याची शुद्धता खूपच उत्तम अशी मानली गेलेली आहे. या कारणामुळे भारतात दुबईतून मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात होते.
एक व्यक्ती दुबईतून किती सोने आणू शकतो?
दुबईतून भारतात तुम्हाला सोने आणायचे असेल तर त्याकरिता एक निश्चित मर्यादा आहे. दुबईतून जर तुम्हाला सोने खरेदी करून भारतात आणायचे असेल तर एक व्यक्ती 20 ग्रॅम पर्यंत सोने भारतात आणू शकतो.या मर्यादेपर्यंत संबंधित व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना 40 ग्रॅम पर्यंत सोने आणण्यास परवानगी आहे व त्यावर महिलांना कर लागत नाही. परंतु या मर्यादेपेक्षा जर जास्त सोने दुबईतून भारतात आणत असाल तर मात्र आयात शुल्क भरणे गरजेचे आहे. आपल्याला माहित आहे की, अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे व ते 15 टक्क्यांवरून चक्क सहा टक्क्यांवर आणले गेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.