जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते प्रदान
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी (आरेवाडी) येथील दरोड्यातील चार संशयितांना अटक करून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जीवाची पर्वा न करता या संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडणाऱ्या पाच पोलिस अंमलदारांना रोख बक्षीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते देण्यात आले.
केरेवाडी (आरेवाडी) येथे दरोडा टाकून पळून जाणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि पोलिस अंमलदारांनी महत्वाची भूमिका निभावली. डायल ११२ वर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील हवालदार पांडुरंग वाघमोडे, नाईक अभिजित कासार, चालक संतोष पाटील, मिरज उपअधीक्षक कार्यालयातील अक्षय जाधव, चालक तात्यासाहेब ओमासे यांना महानिरीक्षक फुलारी यांच्याहस्ते रोख बक्षीस देण्यात आले.दरोडा पडल्याची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर वाघमोडे १५ मिनीटात घटनास्थळावर पोहचले. त्यानंतर त्यांनी याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. त्यामुळे अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकले. माहिती मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केल्याबद्दल वाघमोडे यांना बक्षीस देण्यात आले. कासार यांनाही दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर तेही १५ मिनिटात घटनास्थळी पोहोचले. वरीष्ठ अधिकारी, सहकारी पोलिसांना याची तात्काळ माहिती देऊन एका संशयिताला पकडल्याबद्दल कासार यांना बक्षीस देण्यात आले. चालक पाटील यांनी दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर तेही १५ मिनिटात घटनास्थळी पोहोचले. संशयितांचा पाठलाग करून एकाला पकडण्यात त्यांचाही मोलाचा वाटा असल्याने त्यांनाही बक्षीस देण्यात आले. मिरज उपअधीक्षक कार्यालयातील जाधव आणि चालक ओमासे यांनी दरोड्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एकाला पकडण्यात महत्वाची कामगिरी बजावल्याने त्यांनाही महानिरीक्षक फुलारी यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.