तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो :, हे ऐकून जावयाची सटकली, रागाच्या भरात सासऱ्याला केले खल्लास
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल गावात धक्कादायक घटना घडली.
पत्नीशी अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या संशयातून सासऱ्याने जावयाला सुनावले.
मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने जावयाने सासऱ्याची चाकू भोसकून हत्या
केली.
याप्रकरणी जावयाविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलिसांनी पुढील चौकशीला सुरूवात केली. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच
खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, लकझऱ्या कोब्या काळे असे आरोपी जावायाचे नाव असून तो पुण्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्ने येथील रहिवाशी आहे. तर, सुदाम हिऱ्या चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, जो बोरीबेल येथे वास्तव्यास होता. लकझऱ्या हा बोरीबेल येथे सासरवाडीत गेले असता मयत सुदाम यांनी त्याला शिवीगाळ केली. तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो, असे बोलत सुदाम यांनी लकझऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर लकझऱ्याने आपल्या सोबत आणलेल्या धारदार चाकू सुदामच्या छातीत जोरात खुपसला. या घटनेत सुदाम गंभीर जखमी झाला.नातेवाईकांनी सुदाम यांना बेशुद्ध अवस्थेत दुचाकीवर बसवून दौंड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी सुदाम चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले. सदर घटनेबाबत दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.