Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजीच्या अंत्यविधीची सुरू होती तयारी; नातीला मृतदेहावर दिसलं असं की बोलवले पोलीस

आजीच्या अंत्यविधीची सुरू होती तयारी; नातीला मृतदेहावर दिसलं असं की बोलवले पोलीस
 

पाटणा : एका महिलेचा मृत्यू गूढ बनला आहे. महिलेच्या मुलाने कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. तिरडी उचलत असतानाच महिलेच्या नातीला तिच्या मानेवर विचित्र खूण दिसली. तिने तत्काळ कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खुनाचा गुन्हा असू शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



बिहारच्या मधुबनीमध्ये पंडौर येथील कजियाना येथे ही घटना घडली. कनिजा खातून असं मृत महिलेचं नाव असून ती सकरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. महिलेची नात सजदा खातून हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, तिचे मामा मो. गुलाब सकरी येथे राहतात. तर तिचे आजी आजोबा त्यांच्या कजियाना गावात राहतात. सुमारे महिनाभरापूर्वी तिची आजी मामाकडे राहण्यासाठी आली होती, मात्र सोमवारी रात्री आई आणि मुलामध्ये काही कारणावरून भांडण झालं.


मंगळवारी सकाळी तिच्या मामाने आजीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं. यानंतर सर्वजण तिथे आले आणि आजीच्या मृतदेहाचे विधी करण्याची तयारी सुरू झाली. अंत्ययात्रेच्या आधी मृतदेहाला आंघोळ घातली जात असताना सजदाला तिच्या आजीच्या मानेवर एक विचित्र खूण दिसली. ही खूण दोरीची होती. तिने तत्काळ या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यानंतर कुटुंबीयांनाही हे प्रकरण संशयास्पद वाटलं.

त्यानंतर लगेचच पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण संशयास्पद मानलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तपास पुढे नेत पोलिसांनीच महिलेचा दुसरा मुलगा आलमगीर याला फोनवरून घटनेची माहिती दिली. आलमगीर सध्या अहमदाबादमध्ये राहत आहे. तो मधुबनीला पोहोचल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.