पाणी आहे हे समजून बिबट्यानें पिली हातभट्टीची दारू आणि पुढची कहानी वाचाच
रायपूर : घटना छत्तीसगड राज्यातील धमतरी येथील आहे. गावाशेजारील जंगलात हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू होते. इतक्यात तेथे चक्क बिबट्याने उडी मारली. मग काय... काही जण लपून बसले तर काही जणांनी लडखडत तेथून धूम ठोकली.
पण खरा गोंधळ तर पुढेच झाला.
भट्टीवर असलेली दारू बिबट्या पाणी समजून प्यायला, आणि झाला टुल्ल.. हातभट्टीने आपला गुण दाखवलाच... बिबट्या चालताना लागला लडखडायला... त्याला जंगलाचा रस्ताही नीट आठवेना. लपून बसलेल्यांनी हा प्रकार पाहिला. बिबट्याचे आता तळीराम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांची भीती मोडली. त्यांनी चक्क बिबट्यावर स्वारी करून त्याला फिरवले. काहींनी त्याच्या गळ्यात हात घालून सेल्फी घेतली. पण, शेवटी त्याला जंगलाच्या दिशेने नेऊन सोडले. आधी बिबट्याला पाहिले तेव्हा काही जणांची बोबडी वळली होती; पण आता धडपडत चालणाऱ्या बिबट्याला पाहून मात्र प्रत्येकाची हसून हसून मुरकुंडी वळली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.