Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलीसांच पथक होणार रवाना

कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलीसांच पथक होणार रवाना
 
 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. दिल्लीच्या पतियाला कोर्टाने त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

मात्र यापूर्वी पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताच खेडकर पसार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परदेशात रवाना होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवेगिरी आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपानंतर काही दिवसांपूर्वी 'यूपीएससी'ने पूजा खेडकर हिची निवड रद्द केली आहे. यानंतर पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील पतियाळा हाऊस न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. खेडकर हिच्यावरील आरोपांचा तपास 'यूपीएससी' व लालबहादूर शास्त्री अकादमीकडून सुरु आहे. 

अटक होण्याची शक्यता

पतियाळा हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर हिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे?
पूजा खेडकर हिने बहुविकलांगता या प्रवर्गातून २०२२ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दिली होती. यावेळी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. इतकेच नाही तर कोट्यवधींची संपत्ती असताना आठ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवून नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र देखील सादर केलं. यासोबतच परीक्षा देण्याची मर्यादा संपलेली असताना नावात बदल करुन अनेकदा परीक्षा दिल्याचा प्रकार देखील समोर आला.

दरम्यान ही बनवेगिरी उघड झाल्यानंतर खेडकर विरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच स्वतःची बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पुजा खेडकर यांनी मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नाही. इतकेच नाही तर पुणे पोलिसांनी देखील देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.