Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे गटाला मोठा धक्का :, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीच?:, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ

ठाकरे गटाला मोठा धक्का :, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीच?:, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ
 
 
 
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत.


त्यातच आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाहीच, असे विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

“जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो, तेव्हा कोणताही चेहरा समोर ठेवत नाही. मुख्यमंत्री पदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही. कारण आम्ही महाविकास आघडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. त्यानंतर सत्तेत आल्यावर आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहोत. निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात, त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळते, अशी आमची परंपरा आहे. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं, ते त्या-त्या पक्षातील नेते ठरवतात”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

“त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील याला मान्यता मिळेल असं वाटत नाही. आतापर्यंत विरोधी पक्षाची परंपरा आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाहीत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा हाच चेहरा असतो. आम्ही आमचा जाहीरनामा एकत्र बसून ठरवू. आम्ही काही लोकांकडून पण विषय मागवत आहोत”, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील याला मान्यता मिळेल असं वाटत नाही. आतापर्यंत विरोधी पक्षाची परंपरा आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाहीत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा हाच चेहरा असतो. आम्ही आमचा जाहीरनामा एकत्र बसून ठरवू. आम्ही काही लोकांकडून पण विषय मागवत आहोत”, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली. “पृथ्वीराज चव्हाण यांचं हे एखादे मत असू शकतं. महाविकासआघाडीत आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावर आमच्यात काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत. पण राज्याला एक चेहरा द्यावा लागतो. जर लोकसभेला राहुल गांधी यांचा चेहरा असता तर आणखी काही जागा जिंकता आल्या असत्या. आज विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून राहुल गांधी हेच आहेत. त्यामुळे चेहरा हा विरोधकांनाही असावा लागतो आणि चेहरा हा सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. जर राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर मोठा धक्का बसला आहे. आत्मविश्वासही डळमळीत झाला असता”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

“उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे दोन्हीही नेते या देशात मोदी शाह यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत होते आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. आमच्यात जागावाटपावरुन कोणताही तणाव नाही. आम्हाला असं वाटतंय की प्रत्येक जागेवर असा उमेदवार असावा ज्याची ताकद असेल आणि तो तिथे निवडून येईल. जो पक्ष जास्त जागा जिंकेल, त्याची जागा, असा आमचा फॉर्म्युला आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.